अस्थिव्यंगांना लाभ घेण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात बुधवारी (दि.9 जुलै) दिव्यांग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप आणि मोफत वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात सकाळी 10 वाजता हे शिबिर होणार आहे. अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांगांना आधार देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सर्व अस्थिव्यंगांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय प्रमुख प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख डॉ. अभिजीत दिवटे, प्रकल्प समन्वयक दीपक उमाप, जानकीबाई आपटे विद्यालय मुख्याध्यापक तथा तालुका समन्वयक विजय आरोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विजय आरोटे 9325101994 व जी.आर. जाधव 8668517584 यांच्या संपर्क करण्याचे म्हंटले आहे.