वीर सावरकरांची हिंदुत्वगाथेवर करणार मार्गदर्शन
वेदांत्मा प्रतिष्ठान, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- वेदांत्मा प्रतिष्ठान, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने शनिवारी (दि.26 मे) आयोजित करण्यात आलेल्या वीर सावरकरांची हिंदुत्वगाथा व्याख्यानासाठी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर उपस्थित राहणार आहेत. सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार असून, नगरकरांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सात्यकी सावरकर पहिल्यांदाच शहरात येत असून, व्याख्यानात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात हिंदुत्वासाठी काम करणार्या विविध क्षेत्रातील व्यक्तिंचा गौरव करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित कुलकर्णी, दिनेश जोशी, किशोर जोशी, अमित गटणे, इंजि. केतन क्षीरसागर आदी प्रयत्नशील आहेत.