हितसंबंधांमुळे मागील वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला मुदतवाढ दिल्याचा आरोप
राष्ट्रवादी युवकचे आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत मागील वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याबाबत दिलेल्या ठेक्याची मुदत संपलेली असतात त्वरीत नवीन निविदा प्रसिध्द करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तर वीस वर्षापासून एकाच ठेकेदाराला मुदतवाढ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, ह्यूमन राईटचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शाहरुख शेख, सागर गायकवाड, ओमकार गंजी, महेश माळी आदी उपस्थित होते.
महापालिका हद्दीत नागरिकांना वैद्यकीय सेवा देणार्या विविध वैद्यकीय संस्था व हॉस्पिटल आहेत. यांमधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचर्याचे विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने 2003 मध्ये प्रकल्प उभा केलेला आहे. तो चालवण्यासाठी खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाला वीस वर्षे पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प एकाच ठेकेदाराकडे देण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता प्रकल्पाची मुदत दोन ते तीन वेळा संपूर्ण संपलेली असल्यामुळे नव्याने टेंडर काढून नव्या संस्थेची नियमानुसार नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेतील संबंधित काही अधिकार्यांच्या हितसंबंधांमुळे तोच ठेकेदाराला कायमस्वरूपी मुदत वाढ देण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
शहरात निर्माण होणार्या जैव वैद्यकीय कचर्याचे विल्हेवाट लावणे, याकरिता नेमण्यात आलेल्या ठेकेदारीचे मुदत संपत आल्यामुळे नव्याने निविदा तातडीने प्रसिद्ध करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावे, नवीन संस्थेची सदर ठिकाणी नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे ठेकेदाराशी अधिकार्यांचे निर्माण झालेले हितसंबंध जोपासले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.