• Fri. Mar 14th, 2025

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नगरचे सीए शंकर अंदानी यांची विक्रमी नोंद

ByMirror

Apr 17, 2023

364 धार्मिक स्थळांचे लेखापरीक्षण व कर सल्लागार म्हणून सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी 364 धार्मिक स्थळांचे लेखापरीक्षण व कर सल्लागार म्हणून सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या कामाची नोंद जाहीर करण्यात आली आहे.


शंकर अंदानी सीए असून, मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करीत आहे. त्यांनी मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे काम सेवाभावाने केले. त्यांनी केलेल्या या कामाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. या रेकॉर्डासाठी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कार्य व विक्रम करणारे अत्यंत मोजके व ठराविक व्यक्तींना संधी दिली जाते. यासाठी त्यांच्या कार्याची पूर्णत: छाननी व तपासणी करून विक्रम यादीत नोंद करण्यात येत असते. अंदानी यांच्या रुपाने सामाजिक कार्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले ते पहिले व्यक्ती ठरले आहे.


सीए शंकर अंदानी यांना काही महिन्यांपूर्वी युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मेडल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट सेवा कार्याचा) सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अंदानी यांना जवळपास दीड हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व अहमदनगर महानगरपालिकेचे मागील चौदा ते पंधरा वर्षापासून कर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक शासकीय संस्था व बँकचे ते लेखापरीक्षक व करसल्लागार आहेत.


या कामगिरीबद्दल खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, महापौर रोहिणी शेंडगे, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबासाहेब वाकळे, शीला कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, संजय चोपडा, सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान आदींनी अंदानी यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *