प्रतिबिंब सामाजिक संस्थेचा पुढाकार
समाजबांधवांना उपस्थिर राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि.16 एप्रिल) शहरात मातंग समाजाचा राज्यस्तरीय निशुल्क वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दादू नेटके, सचिव अनिल जगताप यांनी केले आहे.
रविवारी सावेडी येथील भिस्तबाग रोड येथील सोना पार्क (सोना नगर) मध्ये मातंग समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा होणार आहे. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव उपस्थित राहणार असून, विवाह इच्छुक वधू-वर व पालकांनी या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिबिंब सामाजिक संस्था मागील सात वर्षांपासून मोफत वधू-वर पालक परिचय मेळावा घेत आहे. या मेळाव्यातून अनेकांचे रेशीमगाठ जुळून विवाह झाले आहेत. संस्थेच्या वतीने इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांसाठी नोंदणी अर्ज, चहा-पाणी व भोजनाची व्यवस्था निशुल्क ठेवण्यात आलेली आहे. कार्यक्रमास विवाह इच्छुक वधू-वरांना प्रत्यक्ष उपस्थित रहाणे आवश्यक असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजय मंडलिक व खजिनदार नामदेव रोकडे यांनी दिली. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दादू नेटके 9272513071 व अनिल जगताप 9922714353 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.