• Sat. Mar 15th, 2025

नेप्ती उपबाजार समितीमध्ये खोमणे गुळाचा चहा व व नाश्ता सेंटरचा शुभारंभ

ByMirror

Mar 25, 2023

चाय पे चर्चा रंगतदार ठरते -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- चाय व चर्चा हे सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शहरात चाय पे चर्चा रंगतदार ठरत असते. अनेक ठिकाणचे नावजलेले चहाचे ठिकाण ठरलेले आहे. या चहाच्या मार्केटमध्ये एक ब्रॅण्ड बनवून विविध कंपन्या देखील उतरल्या आहेत. नेप्ती उपबाजार समितीची गरज ओळखून सुरु करण्यात आलेला खोमणे गुळाचा चहा व नाश्ता सेंटर ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.


नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकरी, हमाल कामगार व व्यापारी वर्गाला आरोग्यदायी चहा व नाश्ताची दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या खोमणे गुळाचा चहा, रसवंतीगृह व नाश्ता सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी उद्योजक सचिन (आबा) कोतकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, बाजार समितीचे सहाय्यक सचिव संजय काळे, नगरसेवक निखील वारे, नगरसेवक मनोज कोतकर, बाजार समितीचे संचालक भैरु कोतकर, युवा नेते अक्षय कर्डिले, राजू सातपुते, सागर सातपुते, राम नेटके, सुभाष सकट, संचालक विशाल सकट, विकास सकट, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, विजय कुमार, आप्पासाहेब बोरुडे, अजय औसरकर, दिलीप ठोकळ, भास्कर महांडुळे, विकी वाघ, गणेश बोरुडे, अभिजीत बोरुडे, राम पानसंबळ, जपकर, सूर्यवंशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुढे आमदार म्हणाले की, नेप्तीच्या उपबाजार समितीमध्ये पहाटेपासूनच शेतकरी, हमाल कष्टकरी व व्यापारी वर्गाची वर्दळ सुरु असते. या ठिकाणीच चहा व नाश्त्याची गरज भासत असते. या सेंटरच्या माध्यमातून सर्वांची सोय होऊन आरोग्यदायी गुळाचा चहा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी खोमणे गुळाचा चहा केंद्राला शुभेच्छा दिल्या. संचालक विशाल सकट यांनी बाजार समितीमधील शेतकरी, कष्टकरी व व्यापारी वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने चहा नाश्ताची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही दर्जेदार सेवा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमासाठी संदीप ठुबे, संदीप होळकर, अरुण साठे, रोहिदास साठे, विश्‍वास शिंदे, ज्ञानदेव जपकर, भूषण गुंड, रविंद्र भोसले, बापू सातपुते, केतन शेंडगे, रोहिदास नेटके, महादेव नेटके, देविदास शिंदे आदींसह शेतकरी, हमाल-मापाडी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *