अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथे हुसेन मिया व्हॉलीबॉल क्लब आयोजित पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील पांचपीर चावडी व्हॉलीबॉल सहकार क्लबचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेला शहरातील हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
अंतिम सामना पांचपीर चावडी व्हॉलीबॉल क्लब विरुध्द आदर्श क्रीडा क्लब यांच्यात झाला. अत्यंत अटातटीचा झालेल्या या सामन्यात पांचपीर चावडी व्हॉलीबॉल क्लब संघ विजेता ठरला. विजेत्या संघास 11 हजार 111 रुपयाचे रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह बक्षिस म्हणून सन्मानित करण्यात आले.

विजयी संघात अभिजीत खोसे, राजू सुद्रीक मेजर, अरबाज बागवान, सैफअली शेख, बबलू जहागीरदार, सुफीयान बागवान, अल्फेज बागवान, रेहान खान, रहीम शेख, नदीम बागवान, अदिब बागवान, आवेज बेकरीवाला, अमान शेख, जफर बागवान, फैजान बागवान, साद शेख, सुशांत डोईफोडे, जयदीप आमटे, आकिब बिल्डर आदी खेळाडूंचा सहभाग होता. यावेळी शेरअली सय्यद फ्रेंड सर्कलचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.