30 पदकांची कमाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक गेम -2023 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 30 पदकांची कमाई करुन शानदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडून पदके पटकाविली.
एशियन ट्रॅक अॅण्ड टर्फ फेडरेशन इंटरनॅशनल आणि नॅशनल पॅरालिम्पिक कमिटी कंबोडिया आणि क्रिकेट फेडरेशन कंबोडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फोनम पेंन, (कंबोडीया) येथील एटीटीएफ स्टेडियम मध्ये या तीन दिवसीय स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये भारत, कंबोडिया, थायलंड, श्रीलंका आणि बांग्लादेश मधील दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. भारतीय दिव्यांग अॅथलेटिक्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन देशासाठी 13 सुवर्ण, 12 रौप्य आणि 05 कांस्य अशी एकूण 30 पदके या स्पर्धेत पटकाविली आहे.
कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक गेम मध्ये- सुहास मोरे (गोळा फेक – सुवर्ण, भालाफेक- रौप्य), अतुल धनवडे (थाळीफेक- रौप्य, गोळाफेक- कास्य), रोहित गाडवे (लांब उडी – सुवर्ण, भालाफेक – रौप्य), अशोक भोईर (गोळाफेक- सुवर्ण, भालाफेक- कास्य), त्रीवेणी बर्वे (भालाफेक- सुवर्ण, थाळीफेक – रौप्य), मंजुळा महादेवाह (सुवर्ण), भास्करन एम (सुवर्ण, रौप्य), दिपू बी (सुवर्ण, रौप्य), यतीशकुमार सी (सुवर्ण, रौप्य), रणजीत गोयल ( सुवर्ण), निष्ठा ठाकूर (सुवर्ण, कास्य), अमिता पटेल (सुवर्ण, रौप्य), मिथुलाबेंन (रौप्य, कास्य), पायल (सुवर्ण, रौप्य) यांनी भारतीय पॅरालिम्पिक अॅथलेटिक्स संघाचे प्रतिनिधित्व करत पदकांची कमाई केली. संघ व्यवस्थापक म्हणून अहमदनगरचे सुहास मोरे यांनी काम पाहिले. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून अतुल धनवडे यांनी तर मार्गदर्शक म्हणून रघु कुमार आर. हे होते.