• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताह त्रितपपूर्तीचा सोहळा रंगणार

ByMirror

Mar 19, 2023

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन

धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायणाचा त्रितपपूर्तीचा सोहळा रंगणार आहे. गावाच्या नवनाथ मंदिरात या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हे 36 वर्ष असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाचे पाडव्याच्या मुहुर्तावर बुधवारी (दि.22 मार्च) प्रारंभ होणार आहे. हा सोहळा शुक्रवार दि. 31 मार्च पर्यंत रंगणार असून, या दहा दिवस चालणार्‍या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ, नवनाथ सोहळा समिती व अखिल भारतीय वारकरी मंडळाने केले आहे.


वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबाबा देशमुख (आळंदी), वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) व वैकुंठवासी ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) यांच्या आशिर्वादाने तर गुरुवर्य ह.भ.प. मारुती बाबा कुर्‍हेकर (आळंदी देवाची), गुरुवर्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी), रामायणाचार्य ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी), ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगणार आहे.


दहा दिवस चालणार्‍या या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठण), ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (अकोला), ह.भ.प. नरहरी महाराज सांगळे (आळंदी देवाची), ह.भ.प. आचार्य स्वामी मनिषानंद पुरी महाराज (मानवत), ह.भ.प. ज्ञानेश्‍वरी माऊली महाराज कदम (आळंदी देवाची), ह.भ.प. उमेश महाराज दशरथे (आळंदी देवाची), ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ (पिंपळगाव वाघा), ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माऊली करंजीकर (आळंदी देवाची), ह.भ.प. विनोदाचार्य पांडुरंग महाराज गिरी (वावी) यांचे किर्तन होणार आहे.


गुरुवारी 30 मार्च रोजी सकाळी ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर यांचे राम जन्माचे किर्तन करणार आहेत. तर शुक्रवारी (दि.31 मार्च) सकाळी 10 ते 12 या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांचे यांचे काल्याचे किर्तन होवून, महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. दररोज पहाटे काकडा भजन व सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण तर संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. रात्री 7 ते 9 वाजता किर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसाद राहणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी दिली.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *