वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग व भांडीचे वाटप
खडतर प्रवासानंतर चांगले दिवस येणार हे निश्चित -जागृती ओबेरॉय
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा सावली संस्थेत स्नेहाचा रंगोत्सव कार्यक्रम रंगला होता. यावेळी संस्थेतील निराधार वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग व दररोजच्या वापरातील भांडीचे वाटप करण्यात आले.

सेवाप्रीतच्या महिलांनी विद्यार्थ्यांसह सावली संस्थेत धमाल केली. तर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेचा आनंद लुटला. महिलांसह विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, गीता नय्यर, सविता चड्डा, अनू थापर, सारिका मुथा, अर्चना कुलकर्णी, लता राजोरिया, राजू खंडेलवाल, रेखा खंडेलवाल, अंजली महाजन, मंजू झालानी, संतोष खंडेलवाल, मोनिका ताथेड, तारा भुतडा, जयश्री परदेशी, डिम्पल शर्मा, ममता खंडेलवाल, बबिता खंडेलवाल, देवकी खंडेलवाल, श्रेया खंडेलवाल, जया खंडेलवाल आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, नैराश्यामुळे जीवनात यश मिळवता येत नाही. परिस्थितीने निराश न होता, मनातील भिती व न्यूनगंड दूर करून जीवनातील ध्येय साध्य करुन यश संपादन करावे. ध्येय प्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी व आत्मविश्वास गरजेचा आहे. प्रत्येक गुलाबाचे फुल उमळताना त्याला काटेरी प्रवास असतो. रात्रनंतरच सुर्योदय होत असतो, त्याप्रमाणे खडतर प्रवासानंतर चांगले दिवस येणार हे निश्चित असल्याचे सांगितले.

रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाढा चालविणार्या कर्तृत्ववान महिला म्हणून नीलिमा खराडे यांचा यावेळी सेवाप्रीतच्या वतीने सन्मान करण्यात आला. परिस्थितीला न डगमगता आपले अस्तित्व सिध्द केलेल्या महिलेचा सन्मान विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी यावेळी करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा रंगल्या होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. अर्चना खंडेलवाल या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली राठी, अनुजा जाधव, दीपा जैन, शिल्पा पोरे, नीलम खंडेलवाल, शिल्पा शिंगवी, प्रिया गांधी, राखी कोठारी, सोनल लोढा, सोनल जखोटीया, सुरेखा बोरा, तारा भुतडा, वृषाली दंडवते, ज्योती गांधी, कल्पना खंडेलवाल यांचे सहकार्य लाभले.
