• Tue. Oct 28th, 2025

शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

ByMirror

Mar 12, 2023

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप

स्व. राठोड यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत दीनदुबळ्यांचे नेतृत्व केले -अनिल शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्व. अनिल राठोड यांचा हिंदुत्वाचा विचार व वारसा घेऊन शिवसेना कार्यरत आहे. स्व. राठोड यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत दीनदुबळ्यांचे नेतृत्व केले. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी सर्वसामान्यांची सेवा केली. त्यांचे कार्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.


शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांची जयंती शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपप्रसंगी जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबुशेट टायरवाले, विक्रम राठोड, आनंदराव शेळके, रविंद्र लालबोंद्रे, सुनिल लालबोंद्रे, दामोधर भालसिंग, संजय छजलाणी, विनोद शिरसाठ, विशाल शितोळे, प्रल्हाद जोशी, राज कोंडके, अभिषेक भोसले, सौरभ झिंजे, ओंकार शिंदे, कमलेश वाव्हळ, शुभम खराडे, भाऊ कांडेकर, पवन कुमटकर, गणेश कंठाळे, विजय चव्हाण, श्याम सोनवणे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दिलीप सातपुते म्हणाले की, शहरातील सर्वसामान्यांचे नेते ठरलेले भैय्यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहराला दिशा देऊन गुंडप्रवृत्ती थोपविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाने सर्वसामान्यांना बळ व न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


भगवान फुलसौंदर म्हणाले की, स्व. अनिल राठोड दुबळ्यांचा आधार होता. अन्याय अत्याचार विरोधात ते नेहमीच उभे राहिले. सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाबुशेट टायरवाले यांनी कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा मार्ग स्व. राठोड यांनी दाखवला. शहरात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. अर्ध्या रात्री मदतीला धावून जाणारे हे नेतृत्व होते, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *