अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी संतोष रामदास मखरे व राजेंद्र केराबा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहर बँकेच्या संचालक मंडळावर सेवक संचालक म्हणून सेवकांच्या नियुक्तीचे शिफारसपत्र युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना दिले. यावेळी युनियनचे खजिनदार मुरलीधर कुलकर्णी, जिल्हा सहकारी बँकेचे सेवक प्रतिनिधी अशोक पवार उपस्थित होते.
