शिवाजी महाराजांनी प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन स्वराज्य घडविले -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, अमोल कांडेकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, साधना बोरुडे, संगीता लबडे, सुनिता पाचारणे, रेणुका पुंड, शितल गाडे, अजय दिघे, मारुती पवार, गणेश बोरुडे, अभिजीत सपकाळ, निलेश इंगळे, अक्षय बोरुडे, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, मयुर भापकर, विशाल बेलपवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन स्वराज्य घडविले. जाती, धर्मापलीकडे जाऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. समाजात पसरत चाललेली धर्मांधतेला शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याने हद्दपार करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
