राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते पवार यांचे स्वागत करुन विशाल गणेशाची प्रतिमा भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांचे शहरात स्वागत करण्यात आले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश चरणी अजित पवार मुख्यमंत्री होण्याचे साकडे घालून त्यांना श्री विशाल गणेशाची प्रतिमा युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी आमदार संग्राम जगताप, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, विनोद पाचारणे, संजय बोगावत, प्रशांत चौधरी, संदीप शिंदे, राकेश देशमुख, किरण बारस्कर आदी उपस्थित होते.
सुमित कुलकर्णी म्हणाले की, उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेऊन शेतकरी, कामगार वर्गाला न्याय देण्याचे काम केले. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्वांची मनोकामना असून, त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभल्यास राज्याची प्रगती साधली जाणार आहे. तर सर्वसामान्य शेतकरी व कामगार वर्ग सुखावला जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.