• Sat. Mar 15th, 2025

नागालँड विधानसभेच्या विजयाबद्दल रिपाईचा शहरात जल्लोष

ByMirror

Mar 3, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाडू वाटून आनंदोत्सव साजरा

अन्यथा भिंगारला छावणी परिषदेत रिपाई स्वबळावर लढणार -सुनील साळवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दोन उमेदवार निवडून आल्याबद्दल शहरातील मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला, तर पक्षाच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.


या जल्लोषात रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सरचिटणीस विजय भांबळ, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, योगेश त्रिभुवन, गणेश कदम, प्रा. विलास साठे, बापू जावळे, उत्कर्ष भालेराव, सुरेश पाटोळे, आदर्श साळवे, मंगला ठोंबे, कविता नेटके, आकाश भिंगारदिवे, गणेश कदम, बापू जावळे, संदेश पाटोळे, विशाल कदम, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे, मंगला ठोंबे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अधिकृत उमेदवार इम्तिचोबा व वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाल्याचा शहरात जल्लोष रंगला होता.


जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले मार्गक्रमण करत आहे. आंबेडकरी विचाराने देशाच्या कानाकोपर्‍यात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सुरु असून, संपूर्ण देशात रिपाई पक्ष वाढीचे काम सुरु झाले आहे. नागालँडमध्ये पक्षाला मिळालेले यश हे सर्व आंबेडकरी जनतेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीत मित्र पक्षाने सन्मानाने बरोबर घेऊन रिपाईला योग्य जागा द्याव्या. भिंगार हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे. पक्षाला अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यास रिपाई स्वतंत्र्यपणे निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *