• Sat. Sep 20th, 2025

पारनेर पोलीस अधिकारीच्या पिळवणुकी विरोधातील तक्रार अर्जाची चौकशी सुरु

ByMirror

Feb 28, 2023

बुधवारी नोंदविणार तक्रारदारांचे जबाब

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारीच्या गैरकारभाराबाबत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेली तक्रार व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर करण्यात उपोषणाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये चौकशी सुरु करण्यात आली आहे.


या अनुषंगाने तक्रारदार तथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व इतर तक्रारदांना अप्पर पोलीस अधीक्षकांकडून जबाब नोंदविण्यासाठी बुधवारी (दि.1 मार्च) हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.


पारनेर तालुक्यातील पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारी पिडीत तक्रारदारांवर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे, त्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणने व धमकावून अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या पिळवणुकीविरोधात रोडे व इतर तक्रारदांनी उपोषण केले होते.

तर पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांची ड्युटी बटवाडा व रजिस्टर नक्कल, पोलीस निरीक्षक रात्र गस्तीची दप्तर चौकशी, त्यांचे मोबाईल लोकेशन व मोबाईलची सीडीआर तक्रारीनुसार तपासणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *