समाज मंदिर हे सामाजिक व वैचारिक चळवळीचे केंद्र – नगरसेवक राहुल कांबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील समता नगरच्या समाज मंदिरात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, लताताई शेळके, मनोज कोतकर यांच्या पुढाकाराने भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीचा लोकार्पण सोहळा उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते पार पडला.
भगवान गौतम बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाप्रसंगी गणेश ननावरे, अशोक कराळे, बाबासाहेब कोतकर, अनिल ठुबे, श्याम कोतकर, विशाल भिंगारदिवे, बच्चन कोतकर, वैभव कदम, महेश सरोदे, गणेश आनंदकर, गणेश सातपुते, भूषण गुंड, नंदकुमार गायकवाड, विजू कराळे, निलेश सातपुते, नवनाथ कोतकर, गणेश गुंड, प्रसाद आंधळे, सचिन सरोदे, सागर पगारे, केतन कांबळे, मनीष ननावरे, ओमकार कोतकर, रवी कोतकर, सोनू घेंबुड, रामदास गायकवाड, अजय गायकवाड, अनिकेत अरोळे, विकास साळवे, भैय्या शिरसाठ सुरेश पारदे, सचिन माने, मोहन अल्हाट, शांताराम शिंदे, तुषार सोनवणे, सचिन जमधडे, विश्वास तिजोरे, प्रतिक नरवडे, शरद कांबळे, बंटी कांबळे, स्वप्नील कांबळे, पोपट कांबळे, लखन शिंदे आदी उपस्थित होते.

नगरसेवक राहुल कांबळे म्हणाले की, समाज एकजुटीने एकत्र येऊन विकास साधण्याच्या उद्देशाने प्रत्येक हरिजन व दलित वस्तीमध्ये समाज मंदिर असावा ही माजी महापौर संदीप कोतकर यांची संकल्पना होती. या उद्देशाने त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात समाज मंदिर उभे राहिले. त्यांनी 65 लाख रुपयाच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले. त्याचा उपयोग सर्वसामान्य समाजातील नागरिकांना होत आहे. समाज मंदिर हे सामाजिक व वैचारिक चळवळीचे केंद्र असून, या समाजमंदिरातून नागरिकांना बुध्दांच्या विचारांची प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका गौरीताई ननावरे म्हणाल्या की, समाज मंदिरातून समाज एकवटला जात असतो. भगवान गौतम बुध्दांच्या विचाराने समाजाची सुरु असलेली वाटचाल प्रेरणादायी असून, समाजाला बुध्दांच्या विचारांची व संस्काराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पुज्यणेय भन्ते व बाल भिक्खू संघाने यांनी भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली. यावेळी आंबेडकर चळवळीतील सुनील साळवे, किरण दाभाडे, अॅड. संतोष गायकवाड, रोहित आव्हाड, शेखर पंचमुख, कौशल गायकवाड, विवेक भिंगारदिवे, अविनाश भोसले, गौरव साळवे, हर्षल कांबळे, बाळासाहेब गायकवाड, पँथर सेनेचे अतुल भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ, बौद्धाचार्य संजय कांबळे, दीपक अमृत, मिलिंद आंग्रे, प्रकाश कांबळे, विष्णू ढोंबे, रघुनाथ गायकवाड, लक्ष्मण माघाडे आदींसह केडगाव परिसरातील नागरिक व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.