• Sat. Sep 20th, 2025

मुद्रणकलेचा शोध ही मानवी इतिहासातील क्रांतीकारी घटना -डॉ. कळमकर

ByMirror

Feb 28, 2023

दि अहमदनगर प्रेस अ‍ॅनण्ड अलाईड ओनर्स असोसिएशनच्या वतीने शहरात मुद्रणदिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर जोहान्स गुटेनबर्ग यांनी मुद्रण कलेचा शोध लावला, सन 1455 मध्ये गुटेनबर्ग यांनी पहिले मुद्रित स्वरुपाचे पुस्तक प्रसिध्द केले. ही घटना क्रांतीकारी ठरली. या मुद्रणकलेच्या शोधामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडले. विचारांचे, साहित्याचे त्यामुळे आदान प्रदान होणे शक्य झाले आहे. मुद्रण कला काळानुरुप विकास पावली आहे. तिचे स्वरुप आता झपाट्याने बदलत आहे. या बदलाचे भाग होणार्‍या मुद्रकांना चांगले दिवस येणार आहेत. मुद्रणकलेमुळे जागतीक बाजारपेठेत मोठी संधी निर्माण झालेली आहे. त्यामुळेच सर जोहान्स गुटेनबर्ग यांनी शोधलेली ही कला मानवी इतिहासातील क्रांतीकारी घटनाअसल्याचे मत लेखक व शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले.


शहरातील राज पॅलेस या ठिकाणी दि अहमदनगर प्रेस अ‍ॅलण्ड अलाईड ओनर्स असोसिएशनच्या वतीने मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जयंतीनिमित्त जागतिक मुद्रण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. कळमकर बोलत होते.


कार्यक्रमास दिंडी मिरवणुकीने सुरुवात करण्यात आली. पालखीमध्ये जोहान्स गुटेनबर्गयांची प्रतीमा असलेली वारकरी दिंडी प्रदक्षिणा मारण्यात आली. गायक विनय गुंदेचा यांच्या शोधिसी मानवा या भक्ती गीताने मुद्रक मंत्रमुग्ध झाले. सर जोहान्स गुटेन बर्ग यांना पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. मुद्रक झेंडा मान्यवरांच्या हस्ते फडकवण्यात आला. मान्यवरांचे स्वागत समिर कुलकर्णी यांनी तर पाहुण्यांचा परिचय नंदेश शिंदे यांनी करुन दिला. याप्रसंगी डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, जालिंदर बोरुडे, संस्थापक मनोज बनकर, मुद्राचे सुदर्शन बोगा, मुकुंद दळवी, गिरीश बच्चा, मनिष झंवर, अरुण गांगर्डे, अंबादास मंडलिक, पोपट शेळके, विक्रम बनकर, राजेंद्र नजन, सुखदेव सुंबे आदी उपस्थित होते.


पुढे डॉ. संजय कळमकर म्हणाले की, मराठी प्राचीन भाषा असून ती रुजवण्याचं काम वारकरी संप्रदायातील संतांनी केले. मराठीला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण, राजकीय उदासीनतेमुळे प्रश्‍न प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. मुद्रण क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रशांत जिंदम, श्रीमती सविता भापकर, पेंटय्या दासरी, शिरीनाझ शेख, जगदीश गणगले आदींचा सन्मान करण्यात आला.


दि अहमदनगर प्रेस अ‍ॅ्ण्ड अलाईड ओनर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप भगत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा आणि माहिती दिली. संस्थापक अध्यक्ष मनोज बनकर म्हणाले, अहमदनगर शहर झपाट्याने बदलत असून याबदलामध्ये मुद्रकांचा मोठा वाटा आहे. मुद्रण कलेतील आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन उन्नती साधण्याचे अवाहन बनकर यांनी केले.
डॉ. सुचेता धामणे म्हणाल्या की, महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा वारसा सांगतो पण महिलांना अजुनही समाजात योग्य स्थान दिले जात नाही. अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत. महिलादिन साजरा करुन इव्हेंट करण्यापेक्षा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर त्यांना न्याय मिळेल. सावित्रिबाई फुलेंवर भाषण ठोकणारे घरच्या सावित्रीचा विचार करत नाहीत ही समाजातील मोठी शोकांतीका आहे.


माऊली प्रतिष्ठाणचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले की, माणुस कशा परिस्थितीत जीवन जगतो याची चौकशी होत नाही मात्र मृत्यु कसा झाला याची चौकशी करतात. मानवी जीवन जगताना धर्मगुरुंना मानवता दिसत नाही मात्र अंत्यविधीसाठी आपल्या धर्माप्रमाणे विधी करण्यासाठी आग्रही असतात ही आश्‍चर्याची बाब आहे. महापुरुष व महामानवांचे नाव घेवून समाजात बदल होणार नाही त्यांच्या विचारांचे आचरण केल्यास परिवर्तन शक्य. सोशल मिडीयावर स्वयंसेवकांचे अनेक ग्रुप आहेत, दिखाव्यासाठीच सगळा अट्टहास करतात प्रत्यक्षात काम शुन्य असा अनुभव येतो. माणसाला माणुस म्हणून जगु द्या, त्याला देवत्व बहाल केल्याने कार्य संपुष्टात येते. समाजात चांगलं काम करण्यासाठी खुप मोठा संघर्ष करावा लागतो असे ते म्हणाले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश सोमानी, विनायक दिकोंडा, पुरुषोत्तम बुर्हा, तिरमलेश पासकंटी, संजय कुर्हे, संतोष वन्नम, अशोक बोरुडे, बाळासाहेब पवार, पंकज जाधव, मनोज दळवी, सचिन ठुबे, शोएब शेख, नितीन धुमाळ, सुबोध रसाळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले. आभार संस्थेचे सचिव संदीप ठुबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *