• Sat. Mar 15th, 2025

नागापूरच्या उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेसमोर उपोषण

ByMirror

Feb 8, 2023

तर नागापूरच्या जिल्हा परिषद शाळेमागील जागेत स्मशानभूमी न करता उद्यान उभारण्यची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर गावठाण येथील महापालिका उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमावे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत स्मशानभूमीला मंजुरी न देता, उद्यान उभारण्याच्या मागणीसाठी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष शारदा अंतोन गायकवाड यांनी महापालिकेच्या कार्यालयाबाहेर उपोषण केले.

यावेळी अंतोन गायकवाड, मयुरी गायकवाड, सागर सकट, धन्यता गायकवाड आदी उपस्थित होते.
नागापूर गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्या पाठीमागे एक ते दोन एकर मनपाची जागा आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्याच्या हालचाली सुरु असून, तेथे स्मशानभूमी मंजूर करण्यात येऊ नये. या ठिकाणी नागरी वस्ती असून जिल्हा परिषद शाळा आहे. यामध्ये लाहन मुले शिकत आहे. शाळेला खेटून ही जागा असून, या जागेत स्मशानभूमी झाल्यास शाळेतील मुले, शिक्षक व नागरिकांनी प्रेत जळत असताना त्रास होणार आहे. लहान मुले सुद्धा शाळेत येण्यासाठी घाबरतील. नागरिकांना देखील आपली मुले शाळेत पाठवण्यास कुचुंबना होणार आहे. गावासाठी समशानभूमी असल्याने या ठिकाणी स्मशानभूमी न बनविता उद्यान उभारण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


तर नागापूर परिसरामधील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेची उपकार्यालये सुरु आहे. या कार्यालयामध्ये जबाबदार अधिकारी नेमलेला नाही, त्यामुळे नागरिकांना सावेडी येथील तहसील कार्यालयासमोर सावेडी उपनगर भागातील कार्यालयमध्ये तक्रार निवारण करण्यासाठी जावे लागते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागापूर गावठाण येथील महापालिकेचे उपकार्यालय फक्त पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यासाठी उपयोग होतो. मात्र नागरिकांच्या समस्येचे निराकरण केले जात नाही. यासाठी नागरिकांना सावेडी येथे यावे लागत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *