सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले मोफत वृत्तपत्र वाचनालयाचा लोकार्पण
तर गटई स्टॉल योजना आणि मनपाच्या गटई पीच परवान्याचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदास चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने संत गुरु रविदास महाराज यांच्या 646 व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चर्मकार विकास संघाच्या नगर-मनमाड रोड, सावेडी येथील मुख्य कार्यालयात सकाळी 8:30 वाजता संत गुरु रविदास महाराज यांचे विधिवत पूजन व 9 वाजता संत गुरु रविदास महाराज यांची आरती व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केले आहे.
तसेच यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई स्टॉल योजना आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने गटई पीच परवान्याचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
