• Sat. Mar 15th, 2025

पेट्रोल व बॅटरीवर चालणार्‍या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे गुरुवारी अनावरण

ByMirror

Feb 1, 2023

स्वचार्जिंग बॅटरीचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरात जोरदार चर्चा असलेल्या पेट्रोल व बॅटरीवर चालणार्‍या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये गुरुवारी (दि.2 फेब्रुवारी) मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास कार प्रेमी व ग्राहकांना उपस्थित राहण्याचे आवाहन शोरुमचे जनक आहुजा यांनी केले आहे.


नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडची कामगिरी लक्षवेधी आहे. पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्ही प्रणालीवर चालणारे हे हायब्रीड वाहन असून, यामध्ये अत्याधुनिक पाचव्या पिढीतील अतिरिक्त सेटअप असलेली स्वचार्जिंग बॅटरी लावण्यात आली आहे. वाहनाचे ब्रेक लावल्यानंतर बॅटरीची चार्जिंग होते. इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड वाहनाची किंमत 24 लाख 01 हजार 000 रुपये (पासून पुढे) आहे.


नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीडमध्ये क्विल्टेड लेदर पॉवर्ड ऑट्टोमन सीट्स आणि मूड लाइटिंगसह पॅनोरामिक सनरूफ नॉच आहे. यामध्ये हवेशीर फ्रंट रो सीट्स आणि मल्टी झोन एसी आहे. याद्वारे पुढील आणि मागील प्रवाशांसाठी दोन भिन्न तापमान सेट करता येईल. शिवाय, 9 स्पीकर जेबीएल सिस्टीम आहे.


इनोव्हेटिव्ह मल्टीपर्पज क्रॉसओव्हर (आयएमएक्स) या संकल्पनेवर विकसित केलेली नवीन इनोव्हा हायक्रॉस एसयुव्ही सारखीच आहे. वाहनाच्या मागील बाजूस उत्सर्जित करणारे एलईडी टेल लॅम्प, मागील छतावरील स्पॉयलर आणि क्रोम बेल्ट लाइन इनोव्हा हायक्रॉसला एक विशिष्ट ओळख देते.


नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये टोयोटा सेफ्टी सीन्स (टीएसएस) प्रणाली वापरून नवीन सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आहे. टोयोटामध्ये डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री-कोलिजन सिस्टीम (चेतावणी) आणि यासारख्या सुरक्षेचे पर्याय दिलेले आहेत. सहा एसआरएस एअरबॅग्स कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची दुसरी श्रेणी प्रदान करत आहे. ही नवीन इनोव्हा हायक्रॉस अनावरणानंतर शोरुममध्ये पहाण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *