• Sat. Mar 15th, 2025

विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब पिंपळे यांचा सन्मान

ByMirror

Jan 14, 2023

पिंपळे हे समाजशील व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व -मुकेश मुळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाळासाहेब पिंपळे हे कृतीशील, समाजशील, विद्यार्थीप्रिय व विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व असून, त्यांना मिळालेला विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती आहे. असे मत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्‍वस्त व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेशराव मुळे यांनी व्यक्त केले.


नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या आयोजित बैठकीत विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब पिंपळे यांच्या सत्कारप्रसंगी मुळे बोलत होते. या बैठकीस डॉ. धनंजय वाघ, विजयसिंह मिस्कीन, अलकाताई मुळे, मा. सरपंच सुधीर भापकर, मुख्याध्यापिका तारका भापकर उपस्थित होत्या.


शेंडी येथे संपन्न झालेल्या गणित-विज्ञान प्रदर्शनात पिंपळे यांना नगर तालुका गणित-विज्ञान संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस यांच्या हस्ते तर विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार, गणित संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय निक्रड , तालुकाध्यक्ष कल्याण ठोंबरे, उपाध्यक्ष रमाकांत दरेकर, विज्ञान संघटनेचे जिल्हाध्यक्ष बद्रिनाथ शिंदे, अजिंक्य झेंडे, मुख्याध्यापिका सौ. शिंदे, उत्तमराव निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला होता.


बाळासाहेब पिंपळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राळेगण गावच्या सरपंच दिपालीताई भापकर, उपसरपंच कल्पना कुलांगे, पै. शरद कोतकर, संतोष हराळ, बबनराव भापकर, राजश्री जाधव, विजय जाधव, राजेंद्र कोतकर, हरीभाऊ दरेकर, संजय भापकर, निळकंठ मुळे, सुजय झेंडे, अरविंद कुमावत, रामदास साबळे, बाळासाहेब कुताळ, विशाल शेलार आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *