• Sat. Mar 15th, 2025

कोहिनूर मॉलमध्ये यु.एफ.ओ. फास्ट फूड दालनाचा शुभारंभ

ByMirror

Jan 8, 2023

शहरातील खवय्यांना एक पर्वणी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मॉल मध्ये नव्याने सुरु झालेल्या यु.एफ.ओ. फास्ट फूडच्या दालनाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंजि. देवेंद्रसिंह वधवा व मनिषाकौर वधवा यांच्या हस्ते झाले. मोठ्या शहरातील मॉलच्या धर्तीवर नगरकरांच्या सेवेसाठी वधवा परिवार आणि सनी वधवा यांच्या वतीने हे दालन सुरु करण्यात आले आहे.


प्रारंभी गुरुद्वाराचे ग्रंथी गुरभेजसिंह यांच्या हस्ते अरदास करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूरचे संचालक आश्‍विन गांधी, यू.एफ.ओ. चे मार्केटिंग हेड विकास सावंत, उद्योजक जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, हरजितसिंह वधवा, मौजी दिवानी, राजू गुरनानी आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरात देखील मॉल संस्कृती रुजत आहे. नव्याने झालेल्या कोहिनूर मॉलला नगरकरांचा चांगला प्रतिसाद असून, लहान मुलांना खेळण्यापासून ते विविध शॉपिंग बरोबर विविध नामांकित ब्रॅण्डचे फुड देखील उपलब्ध झाले आहेत. या मॉलच्या माध्यमातून युवकांना देखील मोठा रोजगार मिळाला असून, मॉलसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तर शहरातील खवय्यांना ही एक पर्वणी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पाहुण्यांचे स्वागत डॉ. सिनरानकौर वधवा व सहेज वधवा यांनी केले. प्रास्ताविकात सनी वधवा व जस्मीतसिंह वधवा यांनी यु.एफ.ओ. फास्ट फूडद्वारे दिल्या जाणार्‍या सेवांची माहिती दिली. यावेळी प्रशांत मुनोत, मनोज मदान, मोहनसिंह वधवा, महेंद्रसिंह वधवा, अपूर्वा गुजराथी, आर.डी. बोरा, कैलाश नवलानी, अमरजितसिंह वधवा, रजबीरसिंह संधू, दलजीत सिंह, करण धुप्पड, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, राजेश कुकरेजा, अनिश आहुजा, किरण भंडारी, अर्जुन मदान, दिलीप कुलकर्णी, श्रीकांत मांढरे, टोनी कुकरेजा, रामसिंग कथुरिया, सौ. सबरवाल, शरद बेरड, पूर्शिताम बेट्टी, मनयोगसिंग माखिजा, हरीश हरवानी, महेश पाटील, विक्रम बोठे, अर्जितसिंग वधवा, रोमी कथुरीया आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार गगन भुटानी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *