महापुरुषांच्या विचारांची समाजाला गरज -सागर चाबुकस्वार
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खर्या अर्थाने गरज आहे. डॉ. बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. या अलौकिक, तेजस्वी आणि वंदनीय महापुरुषांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार काँग्रेसच्या वतीने छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी चाबुकस्वार बोलत होते. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अर्जुन बेरड, रमेशराव वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सुभाष होडगे, दीपक धाडगे, संतोष हजारे, राधेलाल नकवाल, सदाशिव मांढरे, सुहास जगताप, भाऊसाहेब काळे, डॉ. सद्दाम कच्ची, शशिकांत रायभान, कार्तिक कानडे, अनिल धाडगे आदी उपस्थित होते.
