डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन-दलितांच्या उध्दासाठी कार्य केले -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन यावेळी भिमवंदना करण्यात आली. यावेळी अभिजीत सपकाळ, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, अर्जुन बेरड, रमेशराव वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, सुभाष होडगे, दीपक धाडगे, संतोष हजारे, राधेलाल नकवाल, सागर चाबुकस्वार, सदाशिव मांढरे, सुहास जगताप, भाऊसाहेब काळे, डॉ. सद्दाम कच्ची, शशिकांत रायभान, कार्तिक कानडे, अनिल धाडगे, जयाबाई गायकवाड, प्राची पाटील, मालन भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन-दलितांच्या उध्दासाठी कार्य केले. गुलामगिरीत चाचपडलेल्या समाजाला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता प्रस्थापित केल्याचे सांगितले.
भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशातील वंचित घटकांना मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे जगाला भारताच्या प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली असून, संविधानानेच भारताची एकात्मता टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
