महाविद्यालयीन जीवन व क्रिकेटच्या मैदानातील जुन्या आठवणीने पद्मश्री पवार भारावले
पद्मश्री पोपट पवार यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिवरे बाजारसारख्या छोट्याश्या गावातून सुरु केलेली वाटचाल पद्मश्री पर्यंतच्या प्रवासाला मित्रांच्या सहवासाने प्रेरणा मिळत गेली. नगर शहरात झालेले महाविद्यालयीन शिक्षण व वाडियापार्कला क्रिकेट खेळामुळे सर्व समाजातील मित्र जोडले गेले. मोठा मित्र वर्ग आजही संपर्कात असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

शासनाच्या आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील सिटी लॉनमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री पवार बोलत होते. यावेळी हाजी परवेज, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, समद खान, राजूशेठ सुपेवाले, मतीन सय्यद, वाहिद हुंडेकरी, अब्दुस सलाम, हाजी मिर्जा, आरिफ शेख, डॉ. सईद शेख, हाजी कादीर सर, हाजी सलिम भाई आदींसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
या स्नेह भेटीच्या कार्यक्रमात पद्मश्री पवार व त्यांच्या मित्र परिवाराचे महाविद्यालयीन जीवन व क्रिकेटच्या मैदानातील जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. महाविद्यालयीन जीवनातील मित्रांच्या भेटीगाठीने पवार भारावले. आपल्या जवळचा मित्र हिवरेबाजार सारख्या छोट्याश्या गावाचा कायापालट करुन पद्मश्री पर्यंतच्या कार्याची दखल संपूर्ण भारताने घेतली आहे. ही सर्वांच्या दृष्टीने भूषणावह बाब असून, त्यांनी आपल्या गावाला देशाच्या नकाशावर आनले. त्यांच्या कामातून सर्व मित्र परिवाराला प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थित मित्रांनी व्यक्त केली.
