शिक्षणामुळे समाजाची प्रगती -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी अभिजीत सपकाळ, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अनंतराव गारदे, नाथाजी राऊत, माजी प्राचार्य कैलास मोहिते, सुभाष होडगे, अर्जुनराव बेरड, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, मनोहर दरवडे, विलास तोडमल, दीपक धाडगे, श्याम जाधव, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी समाजात परिवर्तनासाठी उभे आयुष्य खर्च केले. जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर मात करून शिक्षणाची मुहूर्तमेढ फुले दांम्पत्यांनी रोवली. शिक्षणामुळे समाज प्रगत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत केली. फुले दांम्पत्यांच्या योगदानाने समाज सावरला असून, त्यांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.