मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला.
मानवाधिकार फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी शेख यांचा सत्कार केला. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, लायन्स क्लबचे आनंद बोरा, दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, मराठी पत्रकार परिषदच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. या संघटनेच्या राज्याच्या कमिटीवर सरचिटणीसपदी मन्सूर शेख यांना काम करण्याची मिळालेली संधी जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह आहे. जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर मन्सूरभाई शेख सातत्याने काम करत असून, सामाजिक कार्यात देखील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. पत्रकार व त्यांचे कुटुंबीय तसेच समाजातील इतर घटकांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
