सचोटी, प्रामाणिकपणा व नम्रतेने केलेला व्यवसाय बहरतो -सद्गुरु मोरेदादा
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील दहिवाळ सराफ खरवंडीकरच्या नूतन दालनाला श्री क्षेत्र त्रंबकेश्वर गुरू कुलपिठाचे चंद्रकांत मोरेदादा यांनी भेट दिली. यावेळी दहिवाळ परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक नवनाथभाऊ दहिवाळ, अरुणा दहिवाळ, सचिन दहिवाळ, नितीन दहिवाळ, पूजा दहिवाळ, अनिल उदावंत, सुमित बोर्याडे, जयश्री दहिवाळ, विजय दहिवाळ, मयूर दहिवाळ,विजय मैड, साईराज दहिवळ, किशोर खोलम, सुमित बुर्हाडे, आदींसह दहिवाळ परिवारचे सदस्य उपस्थित होते.
चंद्रकांत मोरेदादा म्हणाले की, सचोटी, प्रामाणिकपणा व नम्रतेने केलेला व्यवसाय बहरत असतो. दहिवाळ परिवाराने या गुणांचा अंगिकार करुन आपला व्यवसाय वृध्दींगत केलेला आहे. व्यवसायाबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याची जोड देऊन त्यांचे चांगल्या पध्दतीने कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनाथभाऊ दहिवाळ यांनी सद्गुरुच्या भेटीने जीवनात सुख, समृध्दी मिळत असते. त्यांच्या मार्गदर्शनाने दहिवाळ सराफची वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गुरु पूजन करुन दहिवाळ परिवाराने त्यांचा आशिर्वाद घेतला.