नवनाथ विद्यालय व नृसिंह विद्यालयात डोंगरे यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालय व चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे व नृसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापिका कमल घोडके यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, कला शिक्षक उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अशोक डौले, तुकाराम खळदकर, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, आदम शेख, वर्षा पडवळ, स्वाती अहिरे, कल्पना ठुबे, भाग्यश्री वेताळ, पुष्पवर्षा भिंगारे, आशा आरडे, आशंका मुळे, अनिल पंडित आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

किसन वाबळे म्हणाले की, नगर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी विविध स्पर्धेचे आयोजन करुन ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका कमल घोडके यांनी क्रीडा क्षेत्रात डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. विविध क्रीडा स्पर्धेतून त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहणार असून, ग्रामीण भागातून खेळाडू घडविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.