केंद्रात स्वच्छता सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळालेला पुरस्कार भिंगारकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाकडून भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाला स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये फास्टेस्ट मुविंग कॅन्टोन्मेंट श्रेणीत तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ यांनी भिंगारकरांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांचा सत्कार केला. यावेळी मेजर दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, दिपक बडदे, मनोहर दरवडे, सर्वेश सपकाळ, संतोष हजारे, किशोर भगवाने, रमेश वराडे, सचिन चोपडा, विजय सोमवंशी, अशोक भगवाने, अभिषेक भगवाने, बाळासाहेब सत्रे, विशाल भामरे, सदाशीव मांढरे आदी सदस्य उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाला मिळालेला पुरस्कार सर्व नागरिकांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वच्छतेसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने राबविलेली मोहिम प्रेरणादायी आहे. या मोहिमेत हरदिन मॉर्निंग ग्रुपने देखील सातत्याने सहभाग राहिला. ग्रुपच्या वतीने देखील अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान व वृक्षरोपण सारखे अभियान राबविण्यात आले होते. कॅन्टोन्मेंटच्या कार्याने भिंगारचे नाव देशपातळीवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी मिळालेला पुरस्कार हा सर्व नागरिकांच्या सहभागातून प्राप्त झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वच्छतेसाठी उपक्रम राबविले, त्याला सर्वसामान्यांची साथ मिळाल्याने हे शक्य झाले. स्वच्छता अभियानात हरदिन मॉर्निंग ग्रुपने देखील मोलाची भूमिका बजावली. ग्रुपचे स्वच्छता, पर्यावरण व सामाजिक विषयांवर सुरु असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर यापुढे देखील भिंगार स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर पुढे येण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे, ते म्हणाले.
