• Thu. Oct 16th, 2025

खासगी सावकाराने पैसे वसुलीसाठी पाठवले गुंड

ByMirror

Oct 1, 2022

खासगी सावकाराच्या वसुलीसाठी पोलीस कर्मचारी देखील आल्याचा आरोप

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रकाश भतेजा यांची तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराने पैसे वसुलीसाठी गुंडांना सुपारी दिली असून, गुंड घरी येऊन पैश्यासाठी तगादा लावत लावत आहे, तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार प्रकाश भतेजा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


प्रकाश घनश्याम भतेजा यांच्या तक्रारीवरुन राजेश नारंग (रा. गुलमोहर रोड) यांच्यावर 20 सप्टेंबर रोजी पैसे वसुलीसाठी धमकावल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची कोतवाली पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. नारंग यांना समजपत्र देऊन त्यांच्या विरोधातील तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पुढील कारवाईसाठी वर्ग करण्यात येऊन देखील नारंग यांनी रविवारी (दि.25 सप्टेंबर रोजी) रात्री भतेजा यांच्या घरी काही गुंड पाठवून पैश्याची मागणी करुन जीवे मारण्यास धमकावले. सदर गुंडाबरोबर एक पोलीस कर्मचारी असल्याचा आरोप देखील भतेजा यांनी केला आहे.


प्रकाश भतेजा यांनी दीड वर्षांपूर्वी राजेश नारंग यांच्याकडून 35 लाख रुपये तीन टक्क्याने व्याजाने घेतले होते. यामध्ये वेळोवेळी मुद्दल व व्याज जमा त्यांनी केली आहे. व्याजासह मुद्दलाची एकूण 23 लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. तसेच दोन लाख रुपयाचा चेक त्यांच्या पत्नीच्या नावाने दिला असून, त्यांनी ती रक्कम व्याजामध्ये वळवली आहे. राहिलेले 12 लाखाची नोटरी त्यांच्या मित्राच्या नावाने करुन दिलेली असताना सदरील खासगी सावकाराने अवाजवी रक्कम मागण्यास सुरुवात केली आहे. सदर रक्कम न दिल्याने घरी गुंड पाठवून जीवे मारण्यास धमकावले जात आहे. सदर सावकाराने कुटुंबीयांमध्ये दहशत निर्माण केली असून, तो खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहे. तर कुटुंबीयांचे बरे वाईट झाल्यास त्याला सदरील खासगी सावकार जबाबदार राहणार असल्याचे भतेजा यांनी निवेदनात म्हंटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *