• Wed. Nov 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिवाळीच्या खरेदीला रोकडे होलसेल फटाका स्टॉलची बक्षिसांची आतषबाजी!

ByMirror

Nov 11, 2026
फटाके खरेदीसोबत ग्राहकांना मिळाली बक्षिसांची दिवाळी भेट!

भाग्यवान ग्राहकांना कुलर, मिक्सर, पंखे आणि 15 स्मार्ट वॉचची बक्षिसे; सोडतीत विजेत्यांचे नशीब उजळले


फटाके खरेदीसोबत ग्राहकांना मिळाली बक्षिसांची दिवाळी भेट!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या सणानिमित्त फटाक्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. नगर-कल्याण रोडवरील फटाका मार्केटमधील रोकडे होलसेल फटाका स्टॉलच्या वतीने ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बक्षीस योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त फटाके खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या भाग्यवान सोडतीत विविध आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली. या सोडतीत विजेत्या ठरलेल्या ग्राहकांना कुलर, मिक्सर, सीलिंग फॅन, टेबल फॅन आणि स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.


रोकडे होलसेल फटाका स्टॉलच्या वतीने दिवाळीच्या काळात फटाके खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चिठ्ठ्या सोडतीसाठी जमा करण्यात आल्या होत्या. या चिठ्ठ्यांची सोडत स्टॉलचे संचालक सोमनाथ रोकडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी अहिल्यानगर फटाका व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सोडतीच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली.


या बक्षीस योजनेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून कुलर, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिक्सर, तृतीय क्रमांकामध्ये दोन सीलिंग फॅन व दोन टेबल फॅन, तर चौथ्या क्रमांकामध्ये 15 स्मार्ट वॉच अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे फटाके खरेदीसोबतच बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


यावेळी बोलताना सोमनाथ रोकडे म्हणाले की, गेल्या तीन दशकांपासून रोकडे होलसेल फटाका स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार फटाके उपलब्ध करून दिले जात आहेत. केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून ग्राहक फटाके खरेदीसाठी येथे येतात. ग्राहकांनी वर्षानुवर्षे दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने दिवाळीनिमित्त ही विशेष बक्षीस योजना आयोजित करण्यात आली होती.


ग्राहकांचे समाधान आणि विश्वास हीच आमची खरी कमाई आहे. केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता ग्राहकांशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. गेल्या तीन दशकांच्या प्रवासात ग्राहकांनी दिलेले प्रेम आणि सहकार्य यामुळेच रोकडे होलसेल फटाका स्टॉलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असेही रोकडे यांनी सांगितले.
दिवाळीच्या आनंदात ग्राहकांना बक्षिसांच्या माध्यमातून सहभागी करून घेणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *