नकली सिंहाची धमाल “ या बालकथा संग्रहाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक डॉ.सुदर्शन धस यांच्या “ नकली सिंहाची धमाल “ या बालकथा संग्रहाला मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांचा 2025 या वर्षाचा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. सुदर्शन धस हे रयत शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून विविध वृत्तपत्रे , मासिके व दिवाळी अंक यामधून त्यांचे विविधांगी लेखन सातत्याने प्रकाशित झालेले आहे. यापूर्वी त्यांच्या दोन पुस्तकांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत.
“ आनंदाने गाऊया “ या त्यांच्या विद्यार्थीप्रिय बालकविता संग्रहाची महाराष्ट्र शासन – ग्रंथ निवड समितीमार्फत शासनमान्य ग्रंथांच्या यादीत शिफारस करण्यात आलेली आहे. “ नकली सिंहाची धमाल “ हा बालकथा संग्रह बालवाचकांमध्ये अतिशय लोकप्रिय असून , सदर पुरस्काराबद्दल विविध मान्यवरांनी डॉ. धस यांचे अभिनंदन केले आहे.

