• Thu. Aug 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

रणरागिणी फाऊंडेशनच्या रोहिणी पवार यांचा पुण्यात राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारने गौरव

ByMirror

Aug 12, 2026
महिला सक्षमीकरण कार्याची दखल

महिला सक्षमीकरण कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनानिमित्त पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यांत अहिल्यानगरच्या रणरागिणी मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत “ राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार “ प्रदान करून गौरविण्यात आले . मातोश्री द्रोपदा बबन पठारे चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती शेतकरी सेना तसेच बहुजन भूमी संघटना संचलित मानव हक्क , माहिती अधिकार , दक्ष पोलिस मित्र सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई व मुंबईतील प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर आणि सामाजिक कार्यकर्ते तथा पक्षीमित्र विजय भालसिंग यांच्या हस्ते रोहिणी पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रशीद पठाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणी भोसले, अल्ताफ शेख, विशाल पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रोहिणी पवार गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक सामाजिक उद्योजकता, विकास महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण ग्रामविकास बालविकास संस्थेचे कार्य करीत आहे. महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम त्या करत आहे. महिलांना वेळोवेळी अडचणीत मदत करणे, गृहउद्योग निर्मिर्ती करून महिलांना रोजगार मिळवून देणे, त्यांचे बचत गट स्थापन करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम त्या सातत्याने करत आहे. त्यांच्या या विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *