दोन्ही प्रकरणात 4 लाख 70 हजाराचा दंड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील अति.मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने परक्राम्य संलेख अधिनियम,(Negotiable Instruments Act 1881) चे कलम 138 अंतर्गत दोन्ही धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणांमध्ये आरोपी सागर शंकर पाटील (रा. मालेगाव) यास दोषी ठरवत महत्त्वपूर्ण निकाल दिला. माननीय न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच एका प्रकरणात ₹2,30,000/- व दुसऱ्या प्रकरणात ₹2,40,000/- इतका दंड भरण्याचा आदेश दिला आहे. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक प्रकरणात एक महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगण्याचे आदेश दिले आहेत.
सदर दोन्ही प्रकरणांमध्ये फिर्यादीतर्फे ॲड. फारूक हबीब शेख (तांबोळी) व ॲड. मुजाहीद एम. पठाण यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करुन फिर्यादीची बाजू मांडली. त्यांचा युक्तीवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोष निश्चित करुन शिक्षा ठोठावली आहे.
