• Fri. Jul 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

भोयरे गांगर्डा येथील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Jul 24, 2026
भोयरे गांगर्डा येथील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

भाजप ओबीसी मोर्चा व भोयरे गांगर्डा ग्रामपंचायतीचा पुढाकार

वेळेवर आरोग्य सुविधा मिळाल्यास अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येणार -गणेश बनकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आणि ग्रामपंचायत भोयरे गांगर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, विविध आजारांचे वेळेत निदान व्हावे आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने भोयरे गांगर्डा (ता. पारनेर) येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


हा उपक्रम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे तसेच दत्ता नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच संतोष केकडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, राहुल दादा शिंदे, दत्ता नाना पवार, मनोज मुंगसे, लहु भालेकर, माजी सरपंच भाऊसाहेब भोगडे, माजी उपसरपंच दौलतराव गांगड, किशोर रसाळ, मेजर नाना केकडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज पाटील डोंगरे, सेवा सोसायटी संचालक माणिक पवार, व्हाईस चेअरमन सचिन रसाळ, उद्योजक अक्षय भोगाडे, अक्षय गरदारे, दादासाहेब जवक, गणेश गायकवाड, राजेंद्र गांगड, मेजर प्रमोद रसाळ, विवेक गायकवाड, शेखर पवार, तात्यासाहेब रसाळ, माजी चेअरमन अशोक पवार, संचालक शिवाजी रसाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, विविध आजारांचे प्राथमिक निदान तसेच आवश्‍यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली.
ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाला प्राधान्य दिले आहे. त्यांचा सामाजिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाल्यास अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सरपंच संतोष केकडे म्हणाले की, भोयरे गांगर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यालाही सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. गावातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *