• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

वासन टोयोटा शोरूमला आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची भेट

ByMirror

Jun 30, 2026
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते वाहनाचे वितरण

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते वाहनाचे वितरण


श्रीगोंदा नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस व नगरसेवकांचे शोरुमच्या वतीने स्वागत


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वासन टोयोटाच्या श्रीगोंदा येथील शोरूमला आमदार विक्रमसिंह पाचपुते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस तसेच नगरसेवकांसह सदिच्छा भेट दिली. यावेळी शोरूमचे जनक आहुजा आणि अनिश आहुजा यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी शोरूमची पाहणी करुन टोयोटाच्या नवीन वाहनाचे वितरण देखील केले. आधुनिक सुविधा, ग्राहकाभिमुख सेवा आणि वाहन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाहन उद्योगातील बदलते तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि स्थानिक स्तरावरील रोजगार निर्मिती यांसंदर्भात अनौपचारिक चर्चा करण्यात आली.


यावेळी नगरसेवक राजेंद्र खेडकर, पल्लवी पांडुरंग पोटे, मच्छिंद्र दत्तात्रय शिंदे, सुशील कुमार गुलाबराव, चांदणी दिलीप खेतमाळीस, वंदनाताई संग्राम घोडके, सुनीता अनिल घोडके, सोनाली सागर गोरे, अलका सुनील अनभुले, मनीषा विठ्ठल आनंदकर, शहाजी तुकाराम खेतमाळीस, प्रशांत मिठू गोरे यांच्यासह, राजूशेठ उखांडे, प्रशांत दरेकर, विकास बोरुडे, ज्ञानदेव खेतमाळीस, धनंजय कोथांबीरे, शोरुमचे सुशील ढवण, सौरभ श्रोत्री, अविनाश अडोळकर, प्रविण जोशी, खेतमाळीस आदी मान्यवर उपस्थित होते. शोरूमचे जनक आहुजा आणि अनिश आहुजा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि जागतिक दर्जाचा वाहन खरेदीचा अनुभव देण्यासाठी वासन टोयोटा कटिबद्ध असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *