• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तेजश्री थोरात यांचा गौरव

ByMirror

Jun 26, 2026
सामाजिक संस्थांकडून सत्कार; कर्तव्यदक्ष कार्याबद्दल कौतुक

सामाजिक संस्थांकडून सत्कार; कर्तव्यदक्ष कार्याबद्दल कौतुक


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे नुकत्याच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एपीआय) म्हणून रुजू झालेल्या तेजश्री थोरात यांचा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.


या सत्कार समारंभाला स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद शेख, संजय सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना पै. नाना डोंगरे यांनी सांगितले की, तेजश्री थोरात यांनी यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना अनेक संवेदनशील प्रकरणे अत्यंत जबाबदारीने हाताळली. विशेषतः महिलांशी संबंधित तक्रारी, कौटुंबिक वाद, सामाजिक प्रश्‍न तसेच विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नागरिकांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, संवेदनशीलता आणि तत्परता यांचा उत्तम समन्वय दिसून येतो.


त्यांनी पुढे सांगितले की, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी थोरात यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे यापूर्वीही त्यांचे डोंगरे संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरव केला असून, नुकतीच त्यांची बदली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे झाली असून, नव्या ठिकाणीही त्या आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करून नागरिकाभिमुख पोलीस प्रशासनाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्‍वास व्यक्त केला. सत्कारप्रसंगी उपस्थितांनी तेजश्री थोरात यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *