अष्टांग योगाचे दिले जाणार धडे
निशुल्क शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- योग जागृती केंद्र अहमदनगर शाखेच्या वतीने रविवारी (दि.10 जुलै) आषाढी एकादशी निमित्त निशुल्क ध्यानदर्शन कार्यक्रमातून अष्टांग योग शिकण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत हा कार्यक्रम शांतीकुटीर, देव अपार्टमेंट कोहिनूर मंगल कार्यालया जवळ, सावेडी येथील योग जागृती केंद्रात होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केंद्राचे नंदकुमार यन्नम यांनी केले आहे.
महर्षी पतंजली यांचे योग फक्त आसन प्राणायाम पुरते मर्यादित नसून, यम-नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान, समाधी हे अष्टांग योग त्यांनी सांगितलेले आहे. या अष्टांग योगानुसार पतंजली यांनी ध्यान सातव्या क्रमांकावर सांगितला आहे. अष्टांग योग म्हणजे, आसन, प्राणायाम व ध्यान समाधी यांचा अद्भुत संगम होय. याक्रमाने अष्टांग योग साधल्यास देह, बुद्धि, मन यांच्यामध्ये एक अपूर्व अंतरबाह्य निर्मलता, शुद्धता, स्थिरता, लयबद्धता निर्माण होते आणि साधक अनेक विकारातून सहज मुक्त होऊन आत्मिक शांती व आनंदास उपलब्ध होतो.
अशा प्रकारे अष्टांग योग शिकण्याची आणि जाणून घेण्याची संधी या निमित्ताने इच्छुक साधकांना उपलब्ध झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नंदकुमार यन्नम 8329760052 व प्रशांत भासार 9763849888 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.