• Sat. Mar 15th, 2025

दिंडीने रेल्वेस्टेशन परिसर बनले भक्तीमय

ByMirror

Jul 1, 2022

श्री क्षेत्र सिरसगाव दिंडीचे आनंदनगर परिसरात उत्साहात स्वागत

भाविक व वारकर्‍यांमध्ये रंगला फुगड्यांचा फेर

अहमदनगर (प्रतिनिधी)- माउली… माउली… नामाचा जयघोष… तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात औरंगाबाद येथील श्री क्षेत्र सिरसगाव (ता. वैजापूर) येथील दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने संपुर्ण परिसर भक्तीमय झाले होते.


दिंडीच्या स्वागतासाठी परिसरातील घरांसमोर सडा, रांगोळ्या टाकण्यात आले होते. दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा गजर करण्यात आला. दिंडीत पांढर्‍या पोशाखात भगवे ध्वजे घेऊन सहभागी असलेले वारकरी, तर महिलांच्या डोक्यावर असलेल्या तुळशी वृंदावन अशा शिस्तबध्द संचलन करणार्‍या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले.


या दिंडीत स्थानिक नागरिक, महिला व वारकर्‍यांमध्ये फुगड्यांचे फेर रंगले होते. अ‍ॅड. राजेश कावरे व सौ. संगीता कावरे यांनी ह.भ.प. संजय महाराज दुशिंग, वीणेकरी चांगदेव महाराज भवर यांचे औक्षण करुन सत्कार केला. यावेळी आकाश कावरे, द्वारका कावरे, दत्तात्रय कावरे, सुनंदा कावरे, अशोक कावरे, सोमनाथ जंगम देवा, नलिनी गायकवाड, सपना पुरुषोत्तमवार, सीमा कराळे, कल्पना भोसले, स्नेहल कानडे, जयश्री खोडेकर, आशा नगरकर, आरती मेहता, नंदा चंगेडिया, अजित चेंगेडिया, सुनीता टेके, निकिता ताठे, कीर्ती ताठे, श्रद्धा शिंगवी, नीता गांगर्डे, वर्षा चव्हाण, ज्ञानेश्‍वर चव्हाण, करुणा घनघाव, प्रसाद जोशी, आरती कटारिया, अशोक फुलडहाळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *