• Sun. Feb 22nd, 2026

गुरुवारी आनंदनगरला हनुमान चालीसा पाठ भक्ती संध्याचे आयोजन

ByMirror

Feb 22, 2026

भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन; आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळाचा धार्मिक सोहळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आदिशक्ती सार्वजनिक मित्र मंडळ व महिला मंडळ वतीने गुरुवार, दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 8.00 वाजता श्री हनुमान चालीसा पाठ भक्ती संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदनगर, स्टेशन रोड येथील दत्त मंदिर परिसरात मंगल भक्त सेवा मंडळाचा हा भक्तीमय कार्यक्रम संपन्न होणार असून, या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.


या भक्ती संध्येमध्ये सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण, नामस्मरण व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यातून भाविकांना श्रद्धा व भक्तीचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सामूहिक पठणातून धार्मिक सोहळा रंगणार आहे. हा सोहळा हनुमान भक्तांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *