• Wed. Jan 21st, 2026

आजपासून सावित्री ज्योती महोत्सवाला होणार प्रारंभ

ByMirror

Jan 17, 2026

बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आज पासून (शनिवार दि.17 जानेवारी) सावित्री ज्योती महोत्सवाचे प्रारंभ होत असून, नगरकरांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक तथा जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी केले आहे.


अहिल्यानगर महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय व जिल्हाभरातील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बचत गटांचे वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.


या चार दिवसीय प्रदर्शनात विविध सत्रात पदमश्री पोपट पवार, आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, महाविमचे उमेश कहाते, शब्दगंधचे राजेंद्र उदागे, ॲड. मेहरनाथ कलचुरी, जिल्हा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भूषण बऱ्हाटे, डॉ. सुरेश पठारे, डॉ. रमेश वाघमारे, ॲड. प्रशांत साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. रेणुका पाठक, डॉ. संदीप शिंदे, मंगलताई भुजबळ, सुजाता देवळालीकर, जयश्री पोटे, विद्या सोनवणे, संभाजी गिरी, डॉ. अमोल बागुल, नानासाहेब बेल्हेकर, सुनील गायकवाड, ॲड. कृष्णा झावरे, हेलन पाटोळे, प्रवीण कोंढावळे आदी मान्यवर विविध सत्रात उपस्थित राहणार आहेत.


उद्घाटक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर, धर्मदाय उपायुक्त नवनाथ जगताप उपस्थित राहणार आहेत. बचत गटांच्या स्टॉलमध्ये अकोले राजूरचे हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी, काळभात, पेढे, गावरान कडधान्य, सोनमाळ, राहुरीचे गावरान तूप, सर्व प्रकारचे मसाले, जळगावचे तांबेचे दिवे, ज्वारी पापड्या, नाचणी पापड, जामखेडची लाकडी पोळपाट-लाटणे, आवळ्याची पदार्थ, मेहंदी, मॅग्नेस्टिक थेरपी, आयुर्वेदिक उत्पादने, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन, सेंद्रिय गुळाचा बासुंदी चहा, कॉफी-लेमन टी, रांगोळ्या इतर विविध प्रकारचे वस्त्र, हाताने बनवलेले ज्वेलरी, वुलन प्रोडक्ट, स्किन केअर, खाकर, चटण्या, मुखवास, सर्व प्रकारचे पापड, उन्हाळी पदार्थ, खेळणी, पर्स, वनौषधी, पूजा साहित्य, साडी, रेडिमेड ब्लाऊज, हर्बल कॉस्मेटिक्स, लहान मुलांचे कपडे, गुळ पावडर, माठातले लोणचे यांसह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार आहेत. तसेच यावेळी मॅरेज ब्युरो वधू-वर नोंदणी देखील होणार आहे. महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून, या वर्षी मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, बीड, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर जिल्ह्यातील बचत गट, महिला लघु उद्योगांचे स्टॉल असणार आहेत.


या चार दिवसीय महोत्सवात जिल्हा रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग मार्फत दररोज मोफत आरोग्य तपासणी, निबंध, वकृत्व, चित्रकला, हस्तकला, नृत्य, पथनाट्य, मेहंदी, युवक युवतींना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन, भजन स्पर्धा, लोककला सादरीकरण, वीर पत्नी-वीरमातांचा गौरव, महिला वकिलांचा गौरव, अहिल्यानगर बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारणीचा गौरव, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार वितरण, सामाजिक संस्थांना मार्गदर्शन, राष्ट्रीय युवा सप्ताह असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.


महोत्सव यशस्वी करण्यासाठी जयश्री शिंदे, रजनी ताठे, ॲड. आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. अनिता दिघे, ॲड. तुषार शेंडगे, जयेश शिंदे, इसाभार्इ शेख, मेजर भिमराव उल्हारे, प्रा. सुनील मतकर, हेमलाता कांबळे, दिपाली उदमले, स्वाती डोमकावळे, अश्‍विनी वाघ, अनिल साळवे, पोपट बनकर, ॲड. विद्या शिंदे, ॲड. मनीषा भिंगारदिवे, बाळासाहेब पाटोळे, तुषार रणनवरे, मीनाताई म्हसे, निलेश रासकर, संतोष उल्हारे, कान्हू सुंबे, अक्षय ठोकळ, रमेश गाडगे, रावसाहेब काळे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, राजकुमार चिंतामणी, प्रा. हर्षल आगळे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *