हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम
बाबासाहेबांनी माणसामाणसात समानतेचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगावन गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरातील महेश चिल्न पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ आणि रमेश वराडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. अशोक लोंढे व संजय भिंगारदिवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आला. यावेळी संजय भिंगारदिवे यांनी भीम गीत सादर करून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला.
कार्यक्रमाप्रसंगी रमेश वराडे, जहीर सय्यद, दिलीपराव ठोकळ, मेजर सर्वेश सपकाळ, रतन मेहेत्रे, दीपक अमृत, अभिजीत सपकाळ, दीपकराव घोडके, मिलिंद क्षीरसागर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सरदारसिंग परदेशी, अशोक दळवी, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, प्रशांत भिंगारदिवे, राजू कांबळे, योगेश हळगावकर, योगेश चौधरी, प्रकाश देवळालीकर, किरण फुलारी, दशरथ मुंडे, विनोद खोत, देविदास गंडाळ, विकास निमसे, सार्थक साठे, दीपक बोंदर्डे, सखाराम अळकुटे, आसाराम बनसोडे, राजेंद्र पांढरे, माधव भांबुरकर, नितीन भिंगारकर, दत्तात्रेय कुंदेन, भागवत चिंतामणी आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेला सामाजिक, बौद्धिक आणि घटनात्मक वारसा हा अनमोल आहे. त्यांनी माणसामाणसात समानतेचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. पर्यावरण, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य ही बाबासाहेबांनी मांडलेल्या प्रगत विचारसरणीचीच आधुनिक रूपे आहेत. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही वृक्षारोपण आणि स्वच्छता करून बाबासाहेबांना अभिवादन केल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक अमृत म्हणाले की, बाबासाहेबांनी शिकवलेली बंधुता, समता आणि एकजूट ही केवळ पुस्तकात ठेवण्याची गोष्ट नाही; ती प्रत्यक्ष कृतीतून जपावी लागते. आज पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छतेची सवय आणि सामाजिक बांधिलकी हे सर्व घटक लोकतांत्रिक समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. फक्त वृक्षारोपण किंवा उद्यान स्वच्छ करणे नसून ‘आपण जिथे राहतो ते ठिकाण आपल्या कृतीने सुंदर बनवणे’ हा आहे. प्रत्येकाने एक झाड लावावे, परिसर स्वच्छ ठेवावा आणि बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे सामाजिक योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
