• Thu. Jan 22nd, 2026

आमदार स्व. शिवाजी कर्डिले यांच्या स्मरणार्थ कोल्हारमध्ये 200 नारळाच्या झाडांचे वाटप

ByMirror

Dec 5, 2025

जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम; हरित कोल्हार घडविण्यासाठी पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून दिवंगत आमदार स्व. शिवाजी कर्डिले यांच्या स्मरणार्थ कोल्हार गावात 200 नारळाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. आमदार कर्डिले यांनी विधानसभेत तसेच जिल्ह्यातून विविध विकासकामांच्या माध्यमातून कोल्हारसह संपूर्ण जिल्ह्याची दिशा बदलली. सैनिकांच्या अडचणी असोत वा सर्वसाधारण नागरिकांची समस्याकधीही मदतीला धावून जाणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आठवणीला उजाळा मिळावा आणि गावाला निसर्गरम्यता लाभावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


या वृक्ष वाटप कार्यक्रमाला सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष आले, माजी सरपंच बाबाजी पालवे, कारभारी गर्जे, शिवाजी पालवे, जय हिंद जय शिवाजी पालवे, भाऊसाहेब पालवे, अशोक गर्जे, महादेव पालवे गुरुजी, एकनाथ पालवे, कैलास पालवे, भगवान पालवे, आजिनाथ पालवे, महादेव जावळे, बबन पालवे, सचिन पालवे, रोहिदास पालवे, रोहिदास गीते, किशोर पालवे, लक्ष्मण पालवे, यादव पालवे, मदन पालवे, पोपट पालवे, संदीप जावळे, बाळासाहेब पालवे, सतीश घुले, नवनाथ मिसाळ, विष्णू गिते यांसह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


कोल्हार गावात निसर्ग संवर्धनासाठी नारळाचे झाडे मोठ्या प्रमाणावर लाभदायक ठरणार असून पुढील काळात गावामध्ये निसर्गरम्य वातावरण निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे कर्डिले साहेबांची स्मृती जिवंत राहील आणि कोल्हार आदर्श गाव बनविण्याकडे आणखी एक पाऊल पडले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


सरपंच राजू नेटके म्हणाले की, दिवंगत आमदार स्व. शिवाजी कर्डिले यांनी कोल्हार गावासाठी जे कार्य केले ते अमूल्य आहे. गावाच्या विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देणे, रस्ते-पाणी, शाळा अशा सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणेही त्यांची दूरदृष्टी होती. आज त्यांच्या स्मरणार्थ 200 नारळाचे झाडे वाटप करून आपण निसर्ग संवर्धनाचा उपक्रम सुरू केला आहे. भविष्यात ही झाडे कोल्हारचे सौंदर्य वाढवतील आणि गाव समृद्ध करण्यास हातभार लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवाजी पालवे म्हणाले की, स्व. शिवाजी कर्डिले हे फक्त आमदार नव्हते; ते जनतेचे मनातील नेते होते. त्यांच्या प्रयत्नामुळे कोल्हार गावात अनेक विकासकामांना वेग आला. सैनिकांच्या समस्या असोत किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी ते सोडविण्यासाठी ते धावून येत असत. त्यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी 200 नारळाची झाडे वाटप करण्यात आले आहे. ही झाडे भविष्यात गावाचा निसर्गरम्य परिसर फुलविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *