• Tue. Jan 27th, 2026

बुधवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

ByMirror

Nov 23, 2025

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल स्ट व आनंदऋषीजी नेत्रालयाचा पुढाकार


शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन; रक्तदानाचा सामाजिक उपक्रमाचा समावेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने बुधवारी (दि.26 नोव्हेंबर) रोजी केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी मागील 18 वर्षांपासून वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन विजय वासन, तरुण वासन व जनक आहुजा यांनी केले आहे.


आमदार संग्राम जगताप व पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी आनंदऋषीजी नेत्रालय हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर मंडळी करणार आहेत. तर मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना तपासणीनंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. टाक्याचे ऑपरेशन व बिन टाक्याचे ऑपरेशन अल्पदरात केले जाणार आहे. तर शिबीरार्थींना नंबरचे चष्मे कार्यक्रम स्थळी मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.


शिबिरार्थींना येताना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र व आधारकार्डची झेरॉक्स आणने आवश्‍यक आहे. नांव नोंदणीसाठी जालिंदर बोरुडे 9881810333 व वासन टोयोटा 9604038234 यांच्या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. या शिबिरासाठी घर घर लंगर सेवेच्या सेवादारांचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *