• Sun. Feb 15th, 2026

मराठी साहित्य मंडळाच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरव

ByMirror

Nov 13, 2025

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल


सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाला गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त, मराठी साहित्य मंडळ (ठाणे) संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.


16 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केडगाव येथील स्व. शाहूराव देशमुख साहित्य नगरीत उत्साहात पार पडले. यामध्ये पै. डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, जिल्हा अध्यक्ष त्र्यंबकराव (बाळासाहेब) देशमुख, मेधाताई काळे, प्राचार्य शिवाजीराव भोर, डॉ. ज्ञानदेव पांडुळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, संजय बंदिष्टी, स्वागताध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सुनील मामा कोतकर, मराठी साहित्य मंडळ संस्थेचे ललिता गावंडे, घनश्‍याम पांचाळ, दशरथ यादव, लीना आढे, डी. आर. बांगर, संदिप रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामस्थांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि तीन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी आयोजन केले होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना मराठी साहित्य मंडळ (ठाणे) यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पै. डोंगरे यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *