• Sun. Oct 26th, 2025

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शहराध्यक्षपदी अतुल देव्हारे यांची नियुक्ती

ByMirror

Oct 16, 2025

माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शहराध्यक्षपदी अतुल देव्हारे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या शिफारशी नुसार देव्हारे यांची नियुक्ती करण्यात आली असून, माजी समाज कल्याण मंत्री तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतीसे, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे, प्रदेश सचिव अनिल कानडे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, नगर तालुका अध्यक्ष आप्पासाहेब केदारे, संतोष उदमले उपस्थित होते.


अतुल देव्हारे हे उच्चशिक्षित (एमबीए फायनान्स) असून सामाजिक कार्यात ते सक्रीय आहे. सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान सुरु असून, अन्याय, अत्याचारा विरुद्ध आवाज उठविण्याचे काम करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देव्हारे यांनी समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून कार्यरत राहणार असून, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक कार्य करण्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *