पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सत्कार
सय्यद यांनी लोकाभिमुख कार्याने वेगळी ओळख निर्माण केली -प्रकाश थोरात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पोलीस दलात कार्यरत मन्सूर सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाल्याबद्दल पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मन्सूर सय्यद यांनी अहिल्यानगर मधील विविध पोलीस स्टेशनला कार्यरत असताना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. गुन्हेगारी नियंत्रण, सामाजिक संवाद आणि शांतता प्रस्थापनेसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. सय्यद यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी उभे राहून त्यांना संरक्षण देण्याचे कार्य केले. त्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्याने वेगळी ओळख निर्माण केली असल्याची भावना प्रकाश थोरात यांनी व्यक्त केली.
मन्सूर सय्यद यांना बढती मिळाल्याबद्दल ॲड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, अण्णासाहेब गायकवाड, अनिल घाटविसावे, संजय देवढे, सलिम शेख, डेव्हिड अवचिते, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, पोपट भोसले आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.