उद्योजक बुधवंत बंधूंचा वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम
पर्यावरण संवर्धन हीच खरी सेवा -राजू बुधवंत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोल्हार (ता. पाथर्डी) येथे असलेल्या कोल्हुबाई माता गडावर 11 वडाच्या झाडांची लागवड बुधवंत बंधूंच्या वतीने करण्यात आली. उद्योजक राजू बुधवंत व संजय बुधवंत यांनी आपल्या वडील कै. भगवान बुधवंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या झाडांची लागवड केली.
या वृक्षारोपण उपक्रमाप्रसंगी उद्योजक राजू बुधवंत, अनिल ढवण, पै. प्रताप गायकवाड, उद्योजक विवेक तवले, विष्णु तवले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक फकीर सर, देविदास पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, पोपटभाऊ पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, मुख्याध्यापक महादेव पालवे, उद्योजक म्हातारदेव पालवे, बबन पालवे, ॲड. संदिप जावळे, किशोर पालवे, भाऊसाहेब पालवे, भीमा बुधवंत, देविदास पालवे, जाहिद भाई शेख, सात्विक कथने, किरण आडसुरे, संतोष गर्जे, नितीन गीते, सचिन बुधवंत, भगवान सानप, आजिनाथ पालवे, रामा नेटके, चंदू नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.
राजू बुधवंत म्हणाले की, आमच्या वडिलांच्या स्मृती झाडांच्या माध्यमातून कायमस्वरूपी जिवंत राहतील. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीसारखी नैसर्गिक संकटे ही पर्यावरणातील असमतोलामुळे उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जय हिंद फाउंडेशनच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविला असून यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल ढवण यांनी जय हिंद फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून, कोल्हार गावात निर्माण झालेली वनराई सर्वांचे आकर्षण ठरणार असल्याचे सांगितले. शिवाजी पालवे यांनी कोल्हार ग्रामपंचायत व फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन केले जात असल्याचे स्पष्ट केले. माजी सैनिक तथा माजी सरपंच बाबाजी पालवे यांनी आभार मानले.